पुणेकर तरुणीचे जाऊ बाई जोरात

मुकुंद पोतदार
रविवार, 22 जुलै 2018

पुणे - देशातील पहिल्या राष्ट्रीय महिला रेसिंग मालिकेत पुण्याच्या डॉ. रितिका ओबेरॉय हिची निवड झाली आहे. प्रेक्षक म्हणून एका स्पर्धेला गेलेली रितिका दीड वर्षांत रेस ड्रायव्हर बनली आहे.

दंतवैद्यक असलेल्या, तसेच स्वयंसेवी संस्था चालविणारी रितिका म्हणाली, ‘‘तीन वेळचा राष्ट्रीय विजेता सरोश हटारिया याने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याने आहुरा रेसिंग संघ काढला आहे. ऑनलाइन प्रक्रियेला देशातून हजारहून जास्त महिलांनी प्रतिसाद दिला. त्यातून ६० जणींना प्रत्यक्ष चाचणीसाठी बोलाविले. कोईमतूरला झालेल्या चाचणीतून सहा जणींची निवड झाली.’’

मालिकेतील पहिली फेरी कोईमतूरलाच पार पडली. करी मोटर स्पीडवेचा ट्रॅक दोन किलोमीटर २०० मीटरचा आहे. या अनुभवाविषयी रितिकाने सांगितले, की आम्ही आयुष्यात फॉर्म्युला ४ एलजीबी कार, तसेच रेस ट्रॅक प्रथमच पाहिला. मी यापूर्वी ऑफरोडिंग स्पर्धांत भाग घेतला होता.

ऑफरोडिंगविषयी रितिका म्हणाली, ‘‘आमचे स्नेही दमनिंदरसिंग जेजी यांनी गुरगावला एका स्पर्धेसाठी मला बोलाविले. हिलक्‍लाईम्बमध्ये अनेक अनुभवी स्पर्धक झगडत होते. त्यांनी मला अचानक विचारले, की तू प्रयत्न करणार का...आश्‍चर्याच्या धक्‍क्‍यातून सावरण्यापूर्वीच त्यांनी मला एक्‍सयुव्हीची चावी दिली. मी प्रयत्न करायचे ठरविले. त्यात मला यश आले अन्‌ सर्वांनी माझे कौतुक केले.’’ रितिकाचा रेसिंगमधील प्रवास तेथे सुरू झाला. आतापर्यंत सहा स्पर्धांत तिने पाच करंडक जिंकले आहेत. तसेच, तिने रॉयल राजस्थान रॅलीत ५२ जणांत महिलांमध्ये पहिला, तर एकूण क्रमवारीत पाचवा क्रमांक मिळविला. तीन दिवसांची रॅली ७०० किलोमीटर अंतराची होती. त्यात पहिले दोन दिवस दुसऱ्या क्रमांकावर असताना तिसऱ्या दिवशी टायर फुटल्याचा फटका तिला बसला. बिकानेरमधील अल्टिमेट डेझर्ट चॅलेंज मालिकेत तिला सर्वोत्तम हिला ऑफरोडर हा पुरस्कार मिळाला. रितिका मूळची श्रीरामपूरची आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी येऊन ती पुण्यात स्थायिक झाली.

अष्टपैलू क्रीडानैपुण्य
रितिकाला विविध खेळांची आवड आहे. बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय, बॅडमिंटन-व्हॉलिबॉलमध्ये राज्य पातळीवर ती सहभागी झाली. पुणे विद्यापीठाच्या ७० संघांनी भाग घेतलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत ती सर्वोत्तम खेळाडू ठरली.

Web Title: Dr. Ritika Oberoy first national women racing competition