esakal | काश्मीरमधील या कामगिरीमुळे मराठी तरुण अधिकाऱ्याची थेट पंतप्रधानांकडून दखल
sakal

बोलून बातमी शोधा

SAGAR DOIPHODE

जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या निंबोडी (ता. इंदापूर) गावचे सुपुत्र डॉ. सागर डोईफोडे यांचा पंतप्रधान कार्यालयाने ‘स्क्वाच अॅवार्ड ऑर्डर ऑफ मेरीट’ या अॅवार्डने  सन्मानित केले. 

काश्मीरमधील या कामगिरीमुळे मराठी तरुण अधिकाऱ्याची थेट पंतप्रधानांकडून दखल

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या निंबोडी (ता. इंदापूर) गावचे सुपुत्र डॉ. सागर डोईफोडे यांचा पंतप्रधान कार्यालयाने ‘स्क्वाच अॅवार्ड ऑर्डर ऑफ मेरीट’ या अॅवार्डने  सन्मानित केले. 

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

डॉ. सागर डोईफोडे हे सध्या जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. डोडा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात आहे. कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगला पछाडले आहे. मात्र, कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये काश्‍मिरमधील प्रतिकूल परस्थितीवर डॉ. सागर डोईफोडे यांनी मात केली. स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन जनतेमधील आत्मविश्‍वास वाढविला. कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थानिक नागरिकांना हाताशी धरुन  मास्क निर्मितीच्या कामाला सुरवात केली. अल्पावधीच पाच लाखापेक्षा जास्त मास्कची निर्मिती करून सर्वांना मोफत वाटप केले. तसेच, लॉकडाउनच्या काळामध्ये बाहेरुन आलेल्या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण केले. त्यांनी बाहेरगावावरून आलेल्या सुमारे २० हजार नागरिकांना प्रशासनाच्या मदतीने क्वारंटाइन केले. त्यामुमुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढली नाही. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांना खुद्द पंतप्रधान कार्यालयाने गौरविले आहे. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटावून कर्तव्याचा झेंडा अटकेपार फडकावून इंदापूर व पुणे जिल्हाचे नाव देशपातळीवर उंचावले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. 

डोडामध्ये सध्या केवळ ८० रुग्ण 
डोडा जिल्हामध्ये १५ मेपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. लॉकडाउनच्या नंतर कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. ५ लाख लोकसंख्यामध्ये आतापर्यंत केवळ २८० कोरोना रुग्ण आढळले असून, बाहेरगावरुन आलेल्या प्रवाशी नागरिकांचा त्यात समावेश आहे. यातील २०० रुग्ण बरे झाले आहेत. ८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  २० हजार नागरिकांचे विलगीकरण केले असून, डोडामध्ये सुज्ज कोविड सेंटर व क्वारंटाइन सेंटर सुरु आहेत. 

स्वच्छता व सॅनिटायझेशनला महत्व दिले. त्यामुळे कोरोवरती मात करणे शक्य झाले. सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी केलेल्या सहकार्याचे यश आहे. 
 - डॉ. सागर डोईफोडे
जिल्हाधिकारी, डोडो (जम्मू काश्मीर) 

loading image