पुण्याच्या डॉ. शामा नरुला मिसेस इंडिया यूकेच्या फाइनलमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुण्यात जन्मलेली आणि आता ब्रिटनमध्ये (यूके) राहणारी डॉ. शामा नरुला ही मिसेल इंडिया, युकेच्या फायनलमध्ये पोहचली आहे.

पुणे : पुण्यात जन्मलेली आणि आता ब्रिटनमध्ये (यूके) राहणारी डॉ. शामा नरुला ही मिसेल इंडिया, युकेच्या फायनलमध्ये पोहचली आहे. मिसेस इंडियाच्या यूकेच्या फाइनलमध्ये प्रवेश करणारी ती पुण्यातील पहिली मुलगी आहे. डॉ. शामाने ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. एमइस सोसायटीच्या आबासाहेब गरवारे मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर कर्नाटकच्या मणिपल येथून दंत विद्येचे शिक्षण पुर्ण केले.

सध्या डॉ. शामा यूकेतील न्यूकॅसल येते पती व दोन मुलांसह रहात आहे. महिला सशक्तीकरणासाठी ती कायम कार्यरत असते. यूके चाइल्ड हेल्थ फाऊंडेश आणि कॅन्सर रिसर्च यूके, मेरी क्यूरी कर्करोग संशोधन संस्थेशी ती जोडली गेली आहे. डॉ. शामाला आपण मराठी असल्याचा अभिमान आहे.

हे सांगताना शामा म्हणेत, माझ्यातील मुल्य, तत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शाळेतूनच झाली आहे. आपण घडलो त्या समाजासाठी सकारात्मकतेची आणि मूल्यांची परतफेड करण्यापेक्षा जास्त समाधान कुठलेच नाही. मला पुण्यात यायला आवडते व मी येथे माहेर आश्रम आणि चाइल्ड हेल्थ फाऊंडेशनबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करत असल्याच मला अभिमान वाटतो.

Web Title: Dr Shama Narula from Pune to contest in Mrs India UK Final