प्रामाणिक अभियंत्यांना मित्र बनून सहकार्य करावे - डॉ. श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वांनी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे,'' असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 
 

पुणे- "राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वांनी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे,'' असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

विकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महापालिका अभियंता संघातर्फे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे व कमलाकांत वडेलकर यांच्या वाढदिवसानिमित्त व अभियंता मित्रच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते, पंडित वसंतराव गाडगीळ, मुख्य अभियंता प्रवीण किडे, ठाणे शहर अभियंता अनिल पाटील, लक्ष्मण व्हटकर, माजी सैनिकी अधिकारी विष्णूपंत पाटणकर आदी उपस्थित होते. विष्णूपंत पाटणकर लिखित "भारतीय युद्धकथा' पुस्तकाचे या वेळी प्रकाशन झाले. वसंत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कदम यांनी आभार मानले. 

Web Title: dr. shripal sabnis speak on cooperative engineers in pune