संमेलनाध्यक्षांची भूमिका सर्वस्पर्शीच पाहिजे - डॉ. सबनीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी वैचारिक संवादी भूमिका मांडण्यालाच मी कायम प्राधान्य दिले. त्यासाठी सर्व जाती-धर्मातील सांस्कृतिक प्रवाहांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मी केला. सर्व प्रवाह एकत्र करणारा माणूसच महाराष्ट्राच्या संस्कृतीला न्याय देऊ शकतो. म्हणूनच संमेलनाध्यक्षांची भूमिका ही ठराविक एका घटकाच्या बाजूची नव्हे, तर सर्वस्पर्शीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी अध्यक्षांना दिलेल्या निधीचा हिशेब सादर केला.

संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डॉ. सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेने एक लाख व डी. वाय. पाटील विद्यापीठाने पाच लाख रुपये दिले होते. त्या पैशांच्या वापराचा हिशेब डॉ. सबनीस यांनी परिषदेच्या कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजीमध्ये अनुवाद करणारे प्राचार्य अ. निं. माळी व प्राप्तिकर सल्लागार संतोष सावंत उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत विविध समाजघटकांच्या निमंत्रणावरून विविध प्रकारच्या ३७९ कार्यक्रमांना गेलो. या दरम्यान ‘मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष’, ‘अध्यक्षीय भाषणाची मीमांसा’, ‘संमेलनाध्यक्षांची आत्मकथा’ यासारखी पुस्तके आली.
 
माझ्या अध्यक्षीय भाषणाच्या इंग्रजीतील अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी सचिन इटकर यांनी घेतली आहे. लवकरच आत्मकथेचाही इंग्रजी अनुवाद होईल.’’

गरजेनुसार संस्थांना मदत
संमेलनाध्यक्षांच्या कारकिर्दीतील कार्यक्रमांसाठी डॉ. सबनीस यांना १२ लाख १० हजार रुपयेइतके मानधन मिळाले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र जोशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यापैकी काही रक्कम महामंडळाच्या कोशासाठी देणार का? असा प्रश्‍न डॉ. सबनीस यांना विचारण्यात आला. त्यावर जोशी यांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे; मात्र देणगी कोणाला द्यायची हा माझा प्रश्‍न आहे. गरजेनुसार संस्था, व्यक्तींना मदत करतो. नांदेडच्या कुरुंदकर प्रतिष्ठान व भोपाळच्या मराठी परिषदेला आर्थिक मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाध्यक्षांची कारकीर्द - १५ महिने
कार्यक्रमांची संख्या - ३७९
कार्यक्रमांसाठी झालेला प्रवास - ८० हजार किलोमीटर
कार्यक्रमातून मिळालेले मानधन - १२ लाख १० हजार रुपये

मिळालेला निधी                                                प्रवास खर्च 

महाराष्ट्र साहित्य परिषद - एक लाख रुपये       १ लाख एक हजार ३१०

डी. वाय. पाटील विद्यापीठ - पाच लाख          ५ लाख ५०० 

Web Title: dr. shripal sabnis talking