डॉ. मंडलिकांच्या शोधनिबंधाचे श्रीलंकेत प्रकाशन

दत्ता म्हसकर
बुधवार, 11 जुलै 2018

जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचा संशोधन लेख ‘टिचिंग ऑफ कल्चरल व्हॅल्युज थ्रू द कारटून फिल्म्स’ (कोलंबो) श्रीलंकेतील जागतिक नियतकालिक बहुउद्देशीय संशोधन ग्रॅरी जर्नी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

तरुण पिढी देशाची संपत्ती असून आधार स्तंभ आहे. संस्कृतीच्या परीघात त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण होत असते म्हणून सदर लेखात भारतीय संस्कृती, संस्कृतीची विविध अंगे, धारीष्ट्रपणा, मैत्री, इत्यादीचे विवेचन केलेले आहे.

'छोटा भीम’ या दंतकथेद्वारे समाजातील चांगले व वाईट व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकून या दोन्ही माणसांचे दृष्टीकोन, आचार, विचार, सत्य व असल्याची ओळख, सहकार्याची भावना, शरीर संपत्ती व स्वभावातील फरक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लहान मुले आपल्या सवंगडी निवडताना निश्चितच विचार करतील. नुकतेच बाली (Indonesia) येथे झालेल्या आंतरराष्ट्रिय परिषदेत डॉ. मंडलिक यांचे ‘पर्यावरण आणि मानवी जीवनाचा अभ्यास’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी जपान, श्रीलंका तसेच भारतातील आंतरराष्ट्रिय व राष्ट्रीय परिषदेत ‘महिला सबलीकरण’, ‘हुमन राईट’, ‘भारतीय संस्कृती’, ‘इंग्रजी कादंबरयातील व्यक्तिरेखा’, ‘निसर्ग व मानवी जीवन’, ‘महिला व ग्रामीण अर्थव्यवस्था’,यासारख्या अनेक विषयावर शोध निबंध सादर केलेले असून इंग्रजी विषयातील चार पुस्तकांचे आणि एकतीस शोध निबंध आंतरराष्ट्रिय नियतकालिकामधून प्रसिद्ध झालेले आहेत. डॉ. मंडलिक यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. संजय काळे, संस्था पदाधिकारी, अध्यक्षांचे प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच जुन्नर तालुक्यातील विविध संस्थांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Dr. Sri Lanka Publication of Mandalis Relations