कोरोनाच्या संसर्गामुळे ड्रॅगन फळ यंदा तेजीत 

Dragon-fruit
Dragon-fruit

मार्केट यार्ड - कोरोनामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बाजारात ग्राहकांकडून ड्रॅगन फळाला मागणी वाढली आहे. या फळाला मागणी अधिक आणि आवक कमी आहे. त्यामुळे भाव तेजीत आहेत. 

ड्रॅगन फळाचा हंगाम जून ते ऑक्‍टोबरपर्यंत असतो असतो. मात्र यंदा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डातील फळ विभागात 4 ते 5 टन आवक होत आहे. ही आवक सोलापूर, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. येत्या 15 दिवसांत आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हंगाम बहरात आल्यानंतर रोज 8 ते 10 टनांपर्यंतची आवक होते, अशी माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुपेकर म्हणाले, ""लाल आणि पांढरे अशा दोन रंगांत हे फळ असते. पांढऱ्या फळापेक्षा लाल फळाला अधिक मागणी असते. तसेच दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू येथूनही या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास हे फळ उपयुक्त ठरते.'' 

कोरोना विषाणू ड्रॅगन फळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 20 टक्के भाववाढ झाली आहे. या हंगामात कोरोनामुळे भावात तेजी कायम राहील. 
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड 

ड्रॅगनचे किलोचे दर (रुपयांत) 
घाऊक दर - किरकोळ दर 
लाल फळ- 120 ते 150 - 200 
पांढरे फळ- 60 ते 100 - 150 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com