दापोडीत ड्रेनेज दुरूस्ती कामास सुरूवात

रमेश मोरे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : दापोडी येथील महात्मा फुले नगर, महादेव आळी, गावठाण येथील ड्रेनेज लाईन चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सखल भाग छोट्या व्यासाचे पाईप यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार येथे घडत होते. ड्रेनेज लाईन तुंबल्याने येथील गुलाबनगर, महात्मा फुले नगर आदी भागात मैलामिश्रित घाण पाणी नागरीकांच्या घरात येण्याचे प्रकार पावसाळ्यात नित्याचे घडत होते. पालिका प्रशासनाकडुन येथील चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी (ता.18 जून) 'सकाळ'मधुन 'दापोडीत मैलापाणी घरात', या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

स्थानिक नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे जुन दुरूस्तीचे संथ गतीने चालले काम गतीने करण्याबाबत पाठपुरावा केला होता. येथील पाईप बदलुन चेंबर दुरूस्तीचे काम  करण्यात आले असल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
येथील कर्नावट चाळ अरूंद गल्ली बोळात रस्त्याच्यावर आलेले चेंबर व जुने सिमेंट गट्टु निघाल्याने नागरीकांना पायी चालणेही जिकिरीचे ठरत आहे. येथील निखळलेले जुने गट्टु बदलुन नविन गट्टु टाकण्यात यावे. रस्त्याच्यावर असलेल्या चेंबरची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.

सध्या प्रभागातील अशा सर्व ठिकाणच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. अरूंद गल्ल्यांमधुन सिमेंट गट्टु बसविण्यास संबंधित विभागाला सांगीतले आहे.
- रोहित काटे, नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका 

अरूंद गल्ली, वर आलेली चेंबरची झाकणे यामुळे ये जा करण्यास अडचण येते. लहान मुले, जेष्ठांना येथुन चालण्यास त्रास होतो.
- अंबिका सुर्यवंशी, स्थानिक रहिवाशी

महात्मा फुले नगर येथील काम पुर्ण करण्यात आले आहे. अन्य ठिकाणची किरकोळ दुरूस्तीची कामे सध्या सुरू आहेत. 
- आर.एन.जिंतुरकर, कनिष्ठ अभियंता मलनिस्सारण विभाग ह प्रभाग.

Web Title: Drainage line rapier work start in dapodi