येरवड्यात जेल रस्त्यावरील बसथांब्यासमोर ड्रेनेजच्या पाण्याचे डबके

कारागृहाच्या सीमाभिंतीचा राडारोडा रस्त्यावरच; नागरिकांची व वाहनचालकांची त्रेधातिरपीट
जेल रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्याचे डबके साठले
जेल रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्याचे डबके साठलेSakal

लोहगाव - येरवड्यातील जेल रस्त्यावर कॉमरझोन आयटी पार्क चौकातील बसथांब्यासमोर ड्रेनेजच्या चेंबरमधून पाणी बाहेर येऊन घाण पाण्याचे डबके साठले आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांना बसथांबा सोडून लांब थांबावे लागत असून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर या बसथांब्याच्या समोर दुसऱ्या बाजूला कारागृहाच्या जागेला सीमाभिंत घालण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाचा सर्व राडारोडा व दगड रस्त्यावरच टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अतिशय अरुंद रस्ता उपलब्ध आहे व वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीतून वाट काढताना प्रवाशी, पादचारी, वाहनचालकांची कसरत होत आहे. तर दोन्ही बाजूकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे या चौकात रस्ता ओलांडणेही मुश्किल बनले आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com