नाटकाची तिकिटे मिळणार घरपोच

नाटकाची तिकिटे मिळणार घरपोच

पुणे - ऑनलाइन व्यवस्थेमुळे नाटकांच्या तिकीट बुकिंगची सोय झाली असली, तरी त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र, आता पुण्यातील रसिकांना नाटकांची तिकिटे घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी ही नवी व्यवस्था निर्माण झाली  आहे.

नाटकाला जायचे असेल, तर नाट्यगृहांमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन तिकीट बुकिंग करावे लागते. नाट्यगृहात जाण्यासाठी घरातून बाहेर पडावे लागते आणि ऑनलाइन बुकिंग केले, तर प्रतितिकिटासाठी ३१ रुपये जादा मोजावे लागतात. नाट्यरसिक कुटुंब तीन ते चार तिकिटे घेतात. त्यांना आता माफक दरात घरपोच तिकिटे मिळतील. त्यासाठी आधी पैसे भरण्याची गरज नाही. तिकिटे घरी आल्यावर म्हणजेच ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ तत्त्वावर पैसे द्यायचे असल्याने फसवणुकीची शक्‍यता नाही.

पुण्यातील कुरिअर व्यावसायिक संदीप चाफेकर यांनी हा नवा ट्रेंड नाट्यविश्‍वात आणला आहे. ते म्हणाले, ‘‘ही नवी सुविधा आता आम्ही नाट्यरसिकांना देणार आहोत. त्यासाठी माफक दर आकारला जाणार आहे. पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड, हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी आदी भागांतही नाटकांची तिकिटे घरपोच देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

नाटकांचा प्रेक्षक वाढण्यासाठी नवा पर्याय  उपलब्ध झाला आहे. वर्तमानपत्रांत नाटकांच्या 
जाहिरातीत ऑनलाइन, फोन बुकिंगबरोबरच आता होम डिलिव्हरीसाठी संपर्क क्रमांक आम्ही देत आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चांगली सुविधा आहे.
- प्रवीण बर्वे, नाट्य व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com