नालेसफाईचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - नालेसफाईच्या नावाखाली लाखो रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या कामाचा अहवाल त्‍यांनी मागविला असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

शहरात नालेसफाईची कामे कागदोपत्री दाखविल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. या कामासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया, झालेल्या कामांची पाहणी, त्याची परिणामकारकता याचा तपशील संबंधित विभागांकडून मागविण्यात आला आहे. ओढे-नाल्‍यांची पावसाळ्याआधी ठेकेदारामार्फत दरवर्षी त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. 

प्रत्यक्षात कामे न करताच बिले काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाल्यातील गाळ आणि कचरा काढला नसल्याचेही दिसून आले आहे. महापालिकेचे अधिकारी-ठेकेदारांच्या कारभारामुळे या कामांसाठी ९८ लाख रुपये बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केला होता.

आठ दिवसांत अहवाल शक्‍य  
गेल्या दीड वर्षात करण्यात आलेली नालेसफाई आणि कचरा वाहतुकीच्या कामांचा अहवाल महापालिका पुढील आठ दिवसांत राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या कामांमध्ये गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा महापालिकेने केला.  

कचरा वाहतूकही रडारवर 
महापालिकेचे कचरा वाहतुकीचे धोरण आणि त्याबाबतची निविदा प्रक्रिया याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी मागविली आहे. शहरात जमा होणारा कचरा हस्तांतर केंद्रापर्यंत नेण्यासाठी ठेकेदारामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यावर अधिक खर्च केल्याची तक्रार आहे. 

Web Title: dranage cleaning report chief minister