सहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये प्रतिदिन पावणेतीनशे एमएलडी (दशलक्ष घनमीटर) एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करता येईल. 

पुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये प्रतिदिन पावणेतीनशे एमएलडी (दशलक्ष घनमीटर) एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करता येईल. 

जपानच्या जायका कंपनीने महापालिकेला मुळा- मुठा नदी सुधार योजनेत सहकार्य देऊ केले आहे. या कंपनीकडून आर्थिक मदत मिळणार असून, केंद्र सरकारकडूनही योजनेला निधी मिळणार आहे. नदी सुधार योजनेत अकरा ठिकाणी मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी सहा प्रकल्पांचा प्रस्ताव जायका कंपनीला फेब्रुवारी महिन्यात पाठविण्यात आला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड वर्षापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली होती. तांत्रिक बाबींची पूर्तता आणि सल्लागार नियुक्त करण्यात महापालिकेचा वेळ गेला. जायका कंपनीकडून महापालिकेला सहा प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. यास पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. 

सध्या अस्तित्वात असलेल्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविणे आणि नवीन प्रकल्प उभे करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यास जायका कंपनीचे सहकार्य मिळाले आहे. नायडू प्रक्रिया प्रकल्पासह इतर पाच प्रकल्पांना कंपनीने मान्यता दिली आहे. यामुळे पुढील महिन्यात या चारही प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू होईल. नायडू प्रकल्पात जुना कसबा, नवीन कसबा आणि तोफखाना येथील पंपिंग स्टेशनच्या विविध कामांचा समावेश आहे. भैरोबा नाला, कल्याणीनगर, मत्स्यबीज केंद्र - मुंढवा, न. ता. वाडी, धानोरी येथील प्रकल्पांनाही जायकाने मान्यता दिली.

दृष्टिक्षेपात...
 प्रकल्पासाठी ४५० कोटी रुपये खर्च 
 जायका कंपनीकडून ८५ टक्के रक्कम आणि उर्वरित रक्कम महापालिका देणार
 सध्या ४७७ एमएलडी एवढे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. ही क्षमता ३०० एमएलडीने वाढणार

Web Title: dranage water project permission