ड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. 

गेल्या आठवड्यात राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर खचून मोठा खड्डा पडला होता. याच्या दुरुस्तीचे काम गेल्या सहा दिवसांपासून सुरू असले तरी ते पूर्ण झाले नाही. खचलेल्या ठिकाणी चेंबर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या भागातील पावसाळी गटारे, सांडपाणी आणि मैलापाणी वाहिन्यांच्या जाळ्याविषयी महापालिकेकडे तंतोतंत माहिती उपलब्ध नाही. या रस्त्याखाली जलवाहिन्या, एमएनजीएलच्या वाहिन्या आहेत, त्याविषयी महापालिका प्रशासनाकडे पूर्ण माहिती उपलब्ध नाही. यामुळे खचलेली वाहिनी कोठून कोठे गेली याची माहिती मिळू शकत नाही. आता नवीन वाहिनी टाकून पावसाळी गटार आणि मैलापाण्याचा प्रवाह नियंत्रित करावा लागणार आहे. सातारा येथून सीसीटीव्ही रोबोट सर्व्हे कॅमेरा आणला जाणार आहे. तो वाहिनीत टाकून वाहिनी कोठून कोठे गेली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती  संदीप खर्डेकर यांनी कळविली आहे. 

यापूर्वी काही चेंबर रस्त्याची कामे करताना गाडली गेली आहेत, त्यामुळे ती सापडत नाहीत. यापूर्वी शहरातील काही भागांत रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार का घडत आहेत, हे समजण्यासाठी सर्व प्रकारच्या जुन्या वाहिन्यांच्या जाळ्याविषयी माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रायमूव्ह या संस्थेमार्फत अशा वाहिन्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, या वाहिन्यांवर पडणारा ताण, रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट देखील झाले पाहिजे, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

Web Title: Dranageline Survey