'डेअर टू ड्रीम 2.0' स्पर्धेच्या अर्जासाठी डीआरडीओने वाढविला कालावधी; अंतिम तारीख...

DRDO extends application period for Dare to Dream 2.0 contest
DRDO extends application period for Dare to Dream 2.0 contest

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने आयोजित 'डेअर टू ड्रीम 2.0' स्पर्धेचे अर्ज दाखल करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशातील तळागाळातून युवकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा व ज्यांनी ऑक्टोबरमध्ये काही नवीन तंत्रज्ञान विकसित केले असेल अश्या व्यवसायकांना व स्टार्टअप्सला संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने आता अर्जाचा कालावधी 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षण क्षेत्राला आधुनिक व आत्मनिर्भर करण्याच्या तसेच देशातील युवकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून तयार होणाऱ्या तंत्रज्ञाचा आधारावर देशाला तांत्रिक क्षेत्रात सक्षम करण्याच्या अनुषंगाने ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून विविध श्रेणीतील विजेत्यांना एकूण 36 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेबाबतची अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी डीआरडीओच्या www.drdo.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com