ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह प्रकरणी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मिलिंद संगई
बुधवार, 12 डिसेंबर 2018

बारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

मध्यंतरी बारामतीत तिघांनी दारुच्या नशेत असताना गाडी चालवून केलेल्या अपघातात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गाडीत असलेल्या तिघांवरही पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दारु प्यायल्यानंतर नियंत्रण राखणे अवघड असते याची माहिती असूनही, तशा अवस्थेत गाडी चालवून कोणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यास या पुढील काळात पोलिस कठोर कारवाई करतील असा इशारा अशोक धुमाळ यांनी दिला आहे. 

अनेकदा अशा घटनात अपघाताचा गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित चालकाला त्याचे गांभीर्यच उरत नाही. मात्र दारुच्या नशेत गाडी चालवून अपघात करुन एखाद्याचा जीव घेणाऱ्याविरुध्द या पुढील काळात थेट सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल होणार आहे. 

मद्यपान केल्यानंतर कोणीही दुचाकी किंवा चार चाकी चालविण्याचा प्रयत्न करु नये यात अपघाताचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे आपल्या जीवासह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. यापुढे पोलिस अशा प्रकरणात कठोर कारवाई निश्चितपणे करतील
- पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ

Web Title: drink and Driving Case is now treated as a murder