तनिष्कांच्या पुढाकारातून जुन्नरला वाजवी दरात शुद्ध पाणी

junnar
junnar

जुन्नर : येथील तनिष्का गटाच्या पुढाकारातून नागरिकांना जारमधून शुद्ध व थंड पाणी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली.   

माजी नगरसेविका व तनिष्का वैष्णवी चतूर यांच्या बोडकेनगर येथील शिवबा अॅक्वा या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ नगर पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर यांच्या हस्ते मंगळवारी ता.28 रोजी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती चौरे, एल.एस. चतुर, सुमन चतुर तसेच महिला उपस्थित होत्या. 

जुन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी वाजवी दरात शुद्ध व थंड पाण्याचे जार देण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उज्वला शेवाळे यांनी यावेळी केले.   

शुद्ध पाण्याची गरज, घनकचरा व्यवस्थापन व रेन वॉटर हार्वेस्टिंग याविषयी डॉ.काटकर यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी तनिष्का कविता छाजेड, माधुरी म्हसकर, राधिका कोल्हे, ज्योत्स्ना शिंदे, पुनम तांबे, सुनीता वामन, स्वप्नजा मोरे, उर्मिला थोरवे, महानंदा हिरेमठ, नगरसेविका मोनाली म्हस्के,अश्विनी गवळी, तसेच प्रतिभा कबाडी, माधुरी चायल,रेणूका बोकरिया, दिपा भोसले,प्रतिमा बारवे,काजल आहूजा, ज्योती चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी चतूर केले व तनिष्का सरिता कलढोणें यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com