लायसन्स, ‘आरसी’ ठेवा मोबाईलमध्ये!

मंगेश कोळपकर
Thursday, 1 October 2020

ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड), स्मार्ट लायसन आदी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) कागदपत्रे जवळ घेऊन फिरण्याची आता गरज राहिलेली नाही. ई-फॉर्ममध्ये म्हणजेच केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर किंवा राज्य सरकारच्या एम-परिवहन या ‘ॲप’मध्येही बाळगली तरी चालणार आहे. गुरुवारपासून (ता. १) या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे - ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड), स्मार्ट लायसन आदी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) कागदपत्रे जवळ घेऊन फिरण्याची आता गरज राहिलेली नाही. ई-फॉर्ममध्ये म्हणजेच केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर किंवा राज्य सरकारच्या एम-परिवहन या ‘ॲप’मध्येही बाळगली तरी चालणार आहे. गुरुवारपासून (ता. १) या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिजिटल लॉकर किंवा एम परिवहन ॲपमध्ये आरटीओच्या तपासणीसाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे ठेवण्याची व्यवस्था यापूर्वीच केली आहे. परंतु, पोलिसांनी अडविल्यावर मूळ कागदपत्रे दाखविण्याचे बंधन होते. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १ ऑक्‍टोबरपासून लायसन, आरसी, स्मार्ट कार्ड, पीयूसी, फिटनेस सर्टिफिकेट आदी कागदपत्रे ई-फॉर्ममध्ये जवळ बाळगली तरी चालू शकेल, असे त्यात म्हटले आहे. याबाबत पोलिस, आरटीओ अधिकाऱ्यांनाही केंद्र आणि राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वाहन चालविताना आरटीओची मूळ कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. ती मोबाईलमध्ये ठेवली तरी चालणार आहे.

पुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थाटले कार्यालय

अशा पद्धतीने जवळ ठेवा कागदपत्रे 

 • डिजिटल लॉकर आणि एम-परिवहन या दोन्हीपैकी एक ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. 
 • डिजिटल लॉकर या ॲपमध्ये वैयक्तिक तपशील नोंदवून लॉग-इन करा. 
 • आधार क्रमांक नमूद करा, आधारला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर, डिजिटल लॉकरमध्ये सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवता येतील.

Corona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक

एम-परिवहन ॲप असे वापरा

 • आधार कार्ड किंवा लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाची गरज नाही. 
 • हे ॲप डाऊनलोड केल्यावर वैयक्तिक तपशील नोंदवावे.
 • व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
 • ओटीपी व्हेरीफिकेशननंतर जन्मतारीख किंवा नाव विचारले जाईल.
 • खातरजमा झाल्यावर ड्रायव्हिंग   लायसन्सवर क्‍लिक केले की, त्याची व्हर्च्युअल कॉपी जनरेट होईल. 
 • आरसी कॉपी इतरांना शेअर करता येते.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

वाहनचालकांना हे होणार फायदे

 • लायसन्स, आरसी, मूळ कॉपी सांभाळण्याची गरज नाही.
 • मोबाईलमध्ये ही कागदपत्रे कायमस्वरूपी राहू शकतात.
 • मोबाईल हरविला तरी मूळ ॲपमध्ये कागदपत्रे सुरक्षित.
 • कोणताही खर्च न करता ही सुविधा उपलब्ध.
 • वाहनचालकांना हाताळणीसाठी तर पोलिसांना तपासणीसाठी उपयुक्त अॅप.

पूर्वीपासूनच डिजिटायजेशन
महाराष्ट्रात १९९६ पासून आरसी, लायसन्स डिजिटाईज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुने लायसन्स आरटीओ कार्यालयात नूतनीकरणासाठी आल्यानंतर त्याचे डिजिटायजेशन होते. राज्यात १५ वर्षांपासून तयार होणारे लायसन्स, आरसी डिजिलॉकरमध्ये ठेवता येईल, अशा पद्धतीने तयार केले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता डिजिटल लॉकर किंवा एम-परिवहन ॲपमध्ये नागरिक आरटीओची कागदपत्रे ठेवू शकतात. पोलिस किंवा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबविल्यावर ती दाखविता येतील. परंतु, त्यात कागदपत्रे दाखविता आले नाही अन ओरिजनल लायसन्स जवळ नसेल तर कारवाई होऊ शकते. 
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

केंद्र सरकारची अधिसूचना पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गुरुवारपासून या नियमाची अंमलबजावणी करणार आहे. 
- संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे पोलिस 

डिजिटल लॉकर आणि एम-परिवहन हे दोन्ही ॲप गुगलच्या ‘प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध आहेत. वापरण्यासाठी सुटसुटीत आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे.
- दीपक सोनार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय सूचना विज्ञान पत्र (एनआयसी)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driving License keep RC in mobile