पुणे - अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले

संदिप जगदाळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

हडपसर (पुणे) : मोटार वाहन कायद्यानुसार १६ वर्षांवरील मुलांना गिअर नसलेली आणि १८ वर्षांवरील मुलांना गिअर असलेली दुचाकी चालविण्याची परवानगी आहे, मात्र हडपसर परिसरात सर्रास अल्पवयीन मुले दुचाकी चालवितानाचे चित्र पहायला मिळत आहे. अनेकदा कारवाया करूनही अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या येत आहेत. पालक आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे त्यांना दंड करण्याची कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाहन चालविण्याचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागातून दिला जातो. असा परवाना मिळाल्यानंतरच मुलांनी गाडी चालविणे अपेक्षित आहे. मात्र, मुलाची हौस भागविण्यासाठी अनेक जण मोटर वाहन कायद्यातील वयाच्या नियमापूर्वी मुलांना गाडी चालवायला शिकवतात. गाडी एकट्याला गर्दीच्या रस्त्यांवर चालवायलाही देत आहेत. पाल्याच्या या हट्टापायी रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जीवला धोका निर्माण होऊ शकतो. याचा मात्र, पालकांना विसर पडताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर अनेक अल्पवयीन महाविद्यालयीन व शाळकरी मुले सर्रास गाड्या चालवताना दिसतात. त्यामध्ये भरधाव वेगाने गाडी चालविण्याचे व ट्रीपल सीटचे प्रमाणही अधिक आहे. तसेच नोएंट्रीतून गाडी चालविण्याते प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडले आहेत. 

नागरिक भालचंद्र देशपांडे म्हणाले,  इंद्रप्रस्थ नगर को. हौ. सोसायटी जवळ एका ६ वीत शिकणा-या अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवित होता. त्याच्या भरधाव दुचाकीने तीन वर्षाच्या मुलीला धडक दिली. त्यामुळे मुलगी जखमी झाले. रस्त्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक मोठया येजा करतात. त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये.

याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर म्हणाले, वाहन चालविणाऱ्या मुलांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या पंधरा दिवसात १३ अल्वयीन मुले व गाडीच्या मालकांवर खटले दाखल करून त्यांच्याकडून १५ हजार १०० रूपये दंड अकाराला आहे. नियमानुसार वय पूर्ण नसलेला मुलगा गाडी चालवताना आढळल्यास वाहतूक शाखेकडून पालकांवर खटला दाखल केला जातो. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये. 

Web Title: driving two wheeler by minors are increasing