शहरात दुष्काळ; गावांत सुकाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही शिल्लक राहिला नाही. केवळ शेतीवर उपजीविका करणाऱ्या या भागातील बळिराजावर उपासमारीचे संकट कोसळलेले आहे. मात्र सरकारने तालुक्‍याच्या पूर्व भागातील शहरीकरण झालेला थेरगाव मंडल दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला असून, नुकसान झालेला भाग मात्र त्यातून वगळला आहे. 

मुळशी तालुक्‍यात जून महिन्यात समाधानकारक झालेल्या पावसामुळे भातलावणीची कामे जोमात झालेली होती. या वर्षी चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना शेती होती. परंतु भातलावणीनंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी अपेक्षित असणारा पाऊस सप्टेंबर महिन्यात झालाच नाही. पूर्ण सप्टेंबर महिना कोरडा गेला. त्यामुळे अनेक ठिकाणची भातपिके करपली. उभी पिके कडक उन्हामुळे काळवंडली. जनावरांना वैरणही शिल्लक राहिली नाही.

त्यातही शिल्लक राहिलेल्या भाताची मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी कापणी केली. ते वाळविण्यासाठी खाचरात पसरविले होते. काहींनी भाताची उढवी रचली होती. काहींनी भाताचे दाणे घराच्या बाजूला वाळविण्यासाठी पसरविले होते. परंतु ३ ते ५ नोव्हेंबर या तीन दिवसांत सायंकाळी तालुक्‍यात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे खाचरात पसरलेल्या भाताचे कापलेले पीक वाहून गेले.

Web Title: Drought Agriculture Loss