दुष्काळाने मारले; कंपनीने लुबाडले

frustrated man
frustrated man

लोणी काळभोर - सोशल मीडिया, नामांकित वर्तमानपत्रांत ‘मार्केटिंग क्षेत्रात चार आकडी पगाराची नोकरी’ अशा आकर्षक जाहिराती देऊन दुष्काळी भागातील हजारो तरुणांची एक बहुराष्ट्रीय कंपनी फसवणूक करीत आहे. स्वयंरोजगाराच्या नावाखाली तरुणांकडून १७ हजार पाचशे रुपये फी घेऊन महागडी साबणे, फेअरनेस क्रीम, पेस्ट माथी मारून त्यांना साखळी व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे.

एका बहुराष्ट्रीय कंपनीने स्थानिक एजंटांना हाताशी धरून मागील वर्षभरापासून लोणी काळभोर, बारामती, शिरवळसह रांजणगाव परिसरात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून पन्नास हजारहून अधिक तरुणांना ‘मार्केटिंग ट्रेनिंग’च्या नावाखाली महागडे साबण, फेअरनेस क्रीम, कपडे धुण्याचे साबण असा कोट्यवधींचा माल या तरुणांच्या माथी मारला जात आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीत लोणी काळभोर गावठाण, सिद्राम मळा व लोणी स्टेशन अशी तीन प्रशिक्षण केंद्रे वर्षभरापासून चालवली जात आहेत. यात तीन हजारहून अधिक तरुणांना ट्रेनिंगच्या माध्यमातून साखळी व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. एका तरुणाकडून साडेसतरा हजार रुपये फी घेतली जात आहे. एकट्या लोणी काळभोरमधील तीन प्रशिक्षण केंद्रांतून संबंधित कंपनी पाच कोटी २५ लाख रुपये दर महिन्याला कमावत आहे. 

सोशल मीडिया, नामांकित वर्तमानपत्रांत ‘मार्केटिंग क्षेत्रात नोकरी, पगार चार आकडी’ अशा जाहिराती देऊन विदर्भ, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह कर्नाटक, आंध्राच्या दुष्काळी भागातील हजारो तरुणांना लोणी काळभोर येथे आणले जाते. प्रशिक्षण केंद्रात येताच साडेसतरा हजार रुपये भरून कंपनी नोंदणी करून घेते. नोंदणीनंतर पहिल्या टप्प्यात चार दिवस ट्रेनिंगच्या नावाखाली तरुणांना नोकरी करून उपयोग नाही. उद्योजक बनण्याबाबत त्यांच्या मनावर रुजविले जाते.

पैशांमुळे स्थानिक गप्प
लोणी काळभोर हद्दीतील एका वस्तीत साधारणतः पन्नास ते साठ लोक राहतात. या वस्तीवरील दहाहून अधिक खोल्या कंपनीने भाड्याने घेतलेल्या आहेत. यात चारशे तरुण राहत आहेत. खोलीमालकालाही भाड्यापोटी चांगले पैसे मिळत आहेत.

 या प्रकरणाची सखोल माहिती घेण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. लोणी काळभोर हद्दीतील तीनही ट्रेनिंग सेंटरची तपासणी करण्यात येणार असून, दोषींवर पुढील चोवीस तासांत कारवाई करण्यात येईल.
- सुहास गरुड, उपविभागीय, पोलिस अधिकारी, हवेली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com