दुष्काळ वाढला, रोजगार घटला

गजेंद्र बडे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आगामी आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०) मंजूर केलेल्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात ४४ कोटी रुपयांची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाचा १३९ कोटी ४८ लाख पाच हजार रुपयांचा हा आराखडा आगामी वर्षात मात्र फक्त ९६ कोटी १५ लाख ३१ हजार ५८१ रुपयांचा असणार आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ वाढला, पण रोजगार घटला, असेच चित्र निर्माण झाले आहे. 

\दरम्यान, गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने निर्माण केलेल्या ‘मनुष्य दिना’तही (रोजगारासाठीचा निश्‍चित कालावधी) ९ लाख २९ हजार ७०२ घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात  ३९ लाख २७ हजार ९२२ मनुष्यदिन निश्‍चित करण्यात आले होते. आगामी वर्षात याची संख्या २९ लाख ९८ हजार २२० इतकी करण्यात आली आहे. याच आधारे जिल्ह्याचे वार्षिक लेबर बजेट तयार केले जाते. त्यामुळे मनुष्य दिनात घट झाल्याने, जिल्ह्याच्या वार्षिक लेबर बजेटमध्ये घट झालेली आहे.  

आगामी आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या या आराखड्यातील कामे ही येत्या १ एप्रिलपासून सुरू केली जाणार आहेत. तोपर्यंत चालू आर्थिक वर्षाच्या आराखड्यातील रोजगार हमीची कामे चालू राहणार आहेत. या आराखड्यात नवीन वर्षात एकूण २२ हजार ३३३ कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी १८ हजार नऊ कामे ग्रामपंचायतींमार्फत, तर उर्वरित चार हजार ३२४ कामे अन्य सरकारी यंत्रणांमार्फत केली जाणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा आराखडा आणि संभाव्य मनुष्य दिनाच्या आधारे ‘लेबर बजेट’ तयार करण्यात येते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने २४ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेकडे आराखडा पाठविला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील काही गावे महापालिकेत गेली आहेत. शिवाय हवेली तालुक्‍यातील रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डधारकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आगामी वर्षातील एकूण मनुष्य दिनात घट झालेली दिसते आहे. 
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)  जिल्हा परिषद

रोजगार हमीची आकडेवारी  
 जॉब कार्ड असलेल्या कुटुंबांची संख्या.......१ लाख २४ हजार ९२६ 
 आगामी वर्षाचा आराखडा.......९६ कोटी १५ लाख ३१ हजार ५८१
 ग्रामपंचायतींतर्फे करण्यात येणारी कामे................१८ हजार नऊ 
 अन्य यंत्रणांमार्फत करावयाची कामे.................चार हजार ३२३ 
 रोजगार हमीच्या आराखड्यात झालेली घट.................४४ कोटी

Web Title: Drought Increase Employment Decrease