डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री बंदीचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

पुणे शहर व जिल्ह्यात 1 मार्चपासून नोंदणीकृत डॉक्टरच्या प्रिस्क्रिपनशिवाय औषधे विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार तपासणी पथके स्थापन केली आहेत.

पुणे - नोंदणीकृत डॉक्टरच्या परवानगीशिवाय सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीच्या औषधांची विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सर्दी, ताप, खोकला झाला की, नागरिक दवाखान्यात न जाता औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करत असल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पवार यांनी या औषधांची परस्र विक्री न करण्याचा आदेश सर्व औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाला केली होती. याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र देण्याचा आदेशही सचिव राजीव जाधव यांना दिला होता. त्यानुसार जाधव यांनी तसे पत्र अन्न व औषध आयुक्तांना पाठवले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात 1 मार्चपासून नोंदणीकृत डॉक्टरच्या प्रिस्क्रिपनशिवाय औषधे विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार तपासणी पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या आदेशानुसार आज शहरातील सर्व औषधे विक्रेत्यांना आणि त्यांच्या संघटनांना पत्र दिल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी यांनी सांगितले. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अन्यथा विक्रेत्यांवर कारवाई 
पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व औषधे विक्रेत्यांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राजेश चौधरी यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drug sales ban ordered Without a prescription