खराडीतील उद्यानात तळीरामांचा अड्डा 

sushma1.jpg
sushma1.jpg

पुणे ः लाखो रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीने खराडी येथील सर्व्हे नंबर 30 मध्ये रंगनाथ शंकर पठारे उद्यान नागरिकांसाठी उभारण्यात आले. परंतु, नियमित देखभाल न झाल्याने उद्यानाची अवस्था दयनीय झाली आहे. उद्यानात तळीरामांचा अड्डा सुरू झाला आहे, खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. लवकरात लवकर हे उद्यान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून केली जात आहे. 


2016 मध्ये महापालिकेच्या आरक्षित वीस गुंठे जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे. उद्यानात लहान मुलांसाठी बसवण्यात आलेली खेळणी तुटलेली आहे, तर काही मोडकळीस आलेली आहे. जी आहे तिच्यावर गंज चढलेला आहे. उद्यान परिसरात अस्वच्छता वाढली आहे. काटेरी झाडेझुडपे, गवताचे प्रमाण वाढलेले आहे. उद्यानात मुरूम, दगडी विखुरलेली आहेत. 

लोकांनी कचरा टाकल्याने उद्यानाच्या प्रवेश द्वारासमोरच कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. उद्यानाच्या बाजूला असणाऱ्या शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी परिसरात पसरलेली आहे. हे उद्यान रस्त्यावर असल्याने त्या ठिकाणी तळीरामांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या दृष्टीने ते असुरक्षिततेचे ठरत असल्याचे स्थानिक रहिवासी साधना भगत यांनी सांगितले. 
प्रशासनाने उद्यान पूर्वीसारखे सुशोभित केले, तर सर्व नागरिकांचा वावर वाढेल, यासाठी लवकरात लवकर उद्यानाची डागडुजी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. 

""उद्यानाच्या डागडुजीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल. त्या ठिकाणी अवैध प्रकार सुरू असल्यास संबंधित लोकांवर योग्य ती करवाई केली जाईल.'' - अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक 
------------------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com