पिंपरीत वृद्धाने दारुच्या नशेत सिगारेट पेटवली अन्...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पिंपरी चिंचवड : दारूच्या नशेत सिगरेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. सिगरेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्यामुळे गवताला आग लागली. यात ते पन्नास टक्के भाजले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे.

अशोक जाधव असं 65 वर्षीय भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. शनिवारच्या रात्री ते दारू पिऊन, एका रिकाम्या जागी सिगरेट ओढत होते. सिगरेट पेटवून पेटती माचीस गवतावर फेकली. बघता-बघता आग वाढली. दारूच्या नशेत असल्यानं अशोक जाधव यांना काय करावं हे लक्षात आलं नाही. तितक्यात आगीत ते फसले आणि पन्नास टक्के भाजले.

दोन तरुणांनी त्यांना घरी आणून सोडल्यानंतर घडला प्रकार समोर आला. तातडीने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशोक पत्नी आणि मेहुनीसोबत राहतात.

Web Title: Drunken Older man stuck in fire due to cigarettes