दारुड्या मुलाकडून जन्मदात्यांना मारहाण

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

मंचर : दारू पिण्यासाठी आई-वडील पैसे देत नाहीत. या कारणावरून मुलानेच स्वतःच्या घरासमोर दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर आई वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथे गुरुवारी (ता. 1) संध्याकाळी घडली.

या घटनेसंदर्भात बाळू पांडुरंग भोजने व त्यांची पत्नी ताराबाई भोजने यांनी मंचर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. जारकरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विरोबामळा येथे भोजने कुटुंब राहत आहे. मुलगा अशोक बाळू भोजने (वय 28) याला अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन आहे. गुरुवारी संध्याकाळी दारूच्या नशेत अशोक घरी आला. त्याने वडील बाळू भोजने व आई ताराबाई यांना शिवीगाळ करून अजून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. आईवडिलांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर चिडलेल्या अशोकने हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी आई वडिलांना मारहाण केली. त्यानंतर दुचाकीला आग लावली. रॉकेल टाकून घराचा दरवाजा पेटवून दिला.

माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तर जेल मधून सुटून आल्यानंतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आई वडिलांना देवून अशोक निघून गेला. आज (शुक्रवार) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार ए. व्ही. भोसले करत आहेत.

Web Title: drunken son beat the parents at manchar