पुणे : झिंगाट झालेल्या तरुणांनी कार घुसवली पेट्राेल पंपात..(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आनंदनगर भागातून हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक देत पेट्रोल पंपावर डिझेल भरत असलेल्या टँकरला जाऊन धडक दिली.

सिंहगड रस्ता : आनंदनगर भागातून हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक देत पेट्रोल पंपावर डिझेल भरत असलेल्या टँकरला जाऊन धडक दिली. सुदैवाने या अपघात कुठलीही हानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी छत्तीसगड राज्यातील हाेती. मद्यधुंद अवस्थेत  असलेले चार तरूण ही गाडी घेऊन वेगाने हिंगण्याच्या दिशेने येत हाेते. आनंदनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान अनेक वाहनांना धडक देत, या तरुणांची चारचाकी थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली.

दरम्यान, तेथील डिझेलच्या एका टँकरला ती जाऊन धडकली. हा टॅकर सुमारे वीस हजार लिटरचा होता. तसेच पंपात नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती. मात्र सुदैवाने कुठलीही हानी यावेळी झाली नाही. दरम्यान, नागरिकांनी या चारपैकी दोन तरुणांना पकडून चोप दिला, तसेच ऑपोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी दोन तरुण पळून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunken youth ramp the car in petrol pump