डीएसकेंच्या आणखी पाच गाड्या गुन्हे शाखेकडून जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

ठेवीदारांनी गुंतवणूक केलेले पैसे व त्यावरील व्याज मुदतीत परत न करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमन्ती यांना अटकेत आहेत. सध्या दोघेही येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

पुणे : बांधकाम व्यावसायिक डि. एस. कुलकर्णी यांच्या आणखी पाच गाड्या गुन्हे शाखेने बुधवारी जप्त केल्या. यापूर्वी सहा गाड्या जप्त केल्या असल्याने जप्त केलेल्या गाड्याची संख्या 11 वर गेली आहे. 

ठेवीदारांनी गुंतवणूक केलेले पैसे व त्यावरील व्याज मुदतीत परत न करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमन्ती यांना अटकेत आहेत. सध्या दोघेही येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

गुन्हे शाखेच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इम्पोर्टेंड गाड्या जप्त केल्या होत्या. त्यामध्ये एक पोर्शे, दोन बीएमडब्लू, दोन टोयटा, दोन कैमरी व  एक एमव्ही ऑगस्टा अशा पाच कोटी रूपयांच्या सहा गाड्या जप्त केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता आणखी पाच गाड्या गुरुवारी सकाळी जप्त केल्या. त्यामध्ये तीन इनोव्हा, एक इटिऑस, एक संट्रो व अन्य एक अशा पाच गाड्याचा स्मावेश आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Web Title: DS Kulkarnis 5 cars seized on crime branch pune