डीएसके वैयक्तिक कारणासाठी कंपनी मालमत्ता विकू शकत नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे वैयक्तिक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाहीत, असा दावा करत या प्रकरणी बाजू मांडण्यास परवानगी द्या, अशी मागणी "डीएसकेडीएल'या कंपनीच्या भागधारकाने न्यायालयात केला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. 

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे वैयक्तिक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाहीत, असा दावा करत या प्रकरणी बाजू मांडण्यास परवानगी द्या, अशी मागणी "डीएसकेडीएल'या कंपनीच्या भागधारकाने न्यायालयात केला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. 

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुलकर्णी यांनी जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करण्याबाबत कुलकर्णी यांनी तयारी दर्शविली आहे. यास कंपनीचे भागधारक चंदर भाटिया यांनी ऍड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी कंपनीची मिळकत विकण्यासंदर्भात त्रयस्थ म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी या अर्जावरील सुनावणी 12 एप्रिल रोजी ठेवली आहे. 

कुलकर्णी यांच्यातर्फे ऍड. चिन्मय इनामदार, अप्रमेय शिवदे यांनी न्यायालयाकडे ठेवीदारांचे पैसे देण्यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. कुलकर्णी यांनी साडेसहा कोटी रुपये डिपॉझिट केले असून, वैद्यकीय उपचारासाठी, वृद्धापकाळात आर्थिक गरज, विवाह, शिक्षण किंवा तातडीच्या खर्चासाठी ज्या ठेवीदारांना पैशाची आवश्‍यकता आहे, त्यांची यादी आर्थिक गुन्हे शाखेने तयार करावी. ही यादी त्यांनी न्यायालयास सादर करावी. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांना रक्कम देण्यात यावी, अशी विनंती या अर्जात केली आहे. 

Web Title: DSK can not sell company assets for personal reasons