‘डीएसके’ ठेवीदाराची तंगीमुळे आत्महत्या

‘डीएसके’ ठेवीदाराची तंगीमुळे आत्महत्या

पुणे - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या एका कंपनीत गुंतविलेले पैसे परत न मिळाल्यामुळे ज्येष्ठ ठेवीदाराने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. डीएसकेंकडील ठेव परत न मिळाल्यामुळे व कौटुंबिक ताणातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

तानाजी गणपत कोरके (वय ६०, रा. भीमनगर, घोरपडी) असे त्यांचे नाव आहे. ते रिक्षाचालक होते. त्यांनी चार लाख रुपये डीएसकेंच्या कंपनीत ठेवस्वरूपात ठेवले होते. ठेवीची मुदत २०१७ मध्ये संपली होती, दरम्यान, गुरुवारी रात्री कोरके यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.’’ मला चार मुली आहेत. तीन मुलींचे लग्न झाले. लहान मुलीचा विवाह पैसे नसल्याने करू शकत नाही. माझा पत्नीबरोबर वाद झाला होता. पैसे परत न दिल्यामुळे डीएसकेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा. माझ्या पश्‍चात मिळणारी विम्याची रक्कम व अन्य रक्कम ही लहान मुलीला द्यावी,’’ असे कोरके यांनी मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com