डीएसके ड्रीमसीटी म्हाडा करणार विकसित? 

mhada dsk
mhada dsk

पुणे : डीएसके यांच्याकडे किती भागधारकांनी नेमकी किती रक्कम गुंतविली आहे? याचा कालावधी आणि त्यावरील व्याज तसेच अन्य वित्तीय संस्थांची देय रक्कम किती होते? याचा तपशील द्यावा. त्यानुसार म्हाडाचे धोरण कळविण्यात येईल, असे म्हाडाकडून ठेवीदारांच्या वकिलांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुरसुंगी येथे असलेली डीएसके ड्रीमसीटी आता म्हाडा विकसित करणार काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

ड्रीमसीटी हा डीएसके यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पामधील एक आहे. मात्र ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयश ठरल्याने व त्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्याने अनेक दिवसांपासून तेथील बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील 300 एकर जमीन म्हाडाने ताब्यात घेऊन ती विकसित करावी. त्यातून आलेली रक्कम ठेवीदारांना व्याजासह परत करावी, अशी मागणी अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी ठेवीदारांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्राचे उप-गृहमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे केली होती. त्याची प्रत म्हाडाला देखील देण्यात आली होती. त्यावर म्हाडाने डीएसके यांना देय असलेल्या रक्कमेचा तपशील द्यावा. ड्रीमसिटीच्या जागेचे मालकी हक्क, जागेचा झोन आणि एकूण उपलब्ध होऊ शकणारे क्षेत्र किती आहे, याची माहिती मागवली आहे. तसेच न्यायप्रविष्ट आणि कोणत्याही कारणास्तव बाधित होणाऱ्या जमिनींचे संपादन म्हाडामार्फत करण्यात येत नाही, असे स्पष्ट करीत म्हाडाने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेण्याची भूमिका घेतली आहे. 

या बाबत अॅड. बिडकर यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले की, म्हाडाने ही जागा विकसित केली तर 2.5 एफएसआय मिळू शकतो. त्यामुळे या मालमत्तेची किंमत 6 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचते. त्यातून बॅंक आणि ठेवीदारांचे पैसे देता येऊ शकतात. याबाबत तडजोड अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. म्हाडाने जागा विकसित केल्यास गुंतवणूकदार व इतरांचे पैसे परत देणे सोईस्कर होईल. डीएसके यांचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com