डीएसकेंच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

डीएसकेंच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.

त्यांनी उच्च न्यायालयात जामिनाला विरोध केला. महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com