सांगली पोलिसांकडे आता डीएसकेंचा ताबा

सांगली पोलिसांकडे आता डीएसकेंचा ताबा

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मंगळवारी ताब्यात घेतले.
सांगली येथील न्यायालयात डीएसके यांना हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत डीएसके यांनी पुण्यातील 32 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची 3 हजार कोटींहून अधिक तीन दोषारोपपत्र दाखल केले आहेत. डीएसके न्यायालयीन कोठडीत असून, मागील काही दिवसांपूर्वी येथील न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सून तन्वी यांना मात्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सांगली येथे गुंतवणूकदारांची डीसकेंच्या कंपन्यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डीएसके यांचा ताबा मिळावा, यासाठी सांगली पोलिसांनी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करत येथील न्यायालयाने सांगली पोलिसांना डीएसके यांचा ताबा दिला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित भिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डीएसके यांची पुतणी सई वांजपे यांचा जामीन विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. सई या दीड वर्षाहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. 8 नोव्हेंबर रोजी न्यायालयात दाखल झालेल्या पुरवणी दोषारोपपत्रात या प्रकरणात सई यांचा कोणताही रोल नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना लहान मुलगा आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी केली होती. यास सरकारी पक्षातर्फे विरोध करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com