डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्ता लिलावातून मिळतील ६०० कोटी

DSK
DSK

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ४१२ पैकी १४३ मालमत्तांची यादी शहर पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी सादर केली. या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी दिल्यास त्यातून गुंतवणूकदारांना किमान ५०० ते ६०० कोटी रुपये परत देता मिळतील, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे. 

याप्रकरणी पुढील सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे. ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून राज्यातील सुमारे २८ हजार गुंतवणूकदारांची सुमारे एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com