पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मिळकतींचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे देण्याबाबतची सुनावणी आता 25 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्यासमोर होणार आहे.
कुलकर्णी यांच्या 143 मिळकतींचा लिलाव करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात यादी सादर केली आहे. त्या मिळकतींचा लिलाव करून सुमारे 500 कोटी रुपये परत येऊ शकतील. गुंतवणूकदारांना सुमारे 1286 कोटी रुपये द्यायचे आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या सुनावणीत कुलकर्णी यांनी, 'माझ्या मिळकतींचा लिलाव करण्यापेक्षा दोन वर्षांची मुदत द्या, त्या विकसित करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करतो'' असे सांगितले.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्याला विरोध करताना, 2014 ते 17 दरम्यान कुलकर्णी यांनी मालमत्ता का विकसित केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. कुलकर्णी यांनी त्यांच्या मिळकती "म्हाडा'सोबत विकसित करण्यास सुचविले; परंतु चव्हाण यांनी त्यासाठी गुंतवणूक कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. याप्रकरणी पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार आहे.
|