‘डीएसकें’च्या नव्या मालमत्ता आढळल्या

Building
Building

पुणे - ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या आणखी २५ मालमत्ता शहरात असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर यांना अटक केली होती.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या आदेशानंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. तेव्हा कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. कुलकर्णी यांच्या पुण्यात आणखी मालमत्ता असल्याचीही माहिती तपासामध्ये पुढे आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com