बंद ई-पॉस यंत्रणेमुळे साखर, डाळीपासून गरीब जनता वंचित

download (1).jpg
download (1).jpg

येरवडा:‘‘काम धामाचा वेळ मी मोडू किती, या ग राशनला राशनला लाईन मी लावून किती, आज गव्हू आहे तर तांदुळ नाही,रॉकेल आले तोवर डाळ गायब होई’ '' , असे गीत महिला ऐंशी व नव्वदच्या दशकाता म्हणत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे वास्तव दाखवत होते. ही परिस्थिती आज ही बदललेली नसल्याचे दिसून येते.

एेन दिवाळी शहरातील स्वस्तधान्य दुकानात डाळ अजून आलेली नाही. तर साखर आली पण ई-पाॅस ही आधार लिंक बायोमेट्रिक यंत्रणा बंद असल्यामुळे दुकानदाराला मंगळवारी एकाही शिधापत्रिका धारकाला साखर देता आली नाही. त्यामुळे दिवाळी नंतर डाळ आणि साखर मिळणार का ? असा संतप्त सवाल शिधापत्रिका धारकांनी विचारला आहे. 

अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिवाळी आधी अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिका धारकांना रेशनवर स्वस्त दरात डाळ आणि साखर देण्याचा दावा केला होता. शहरातील गरिब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. 

गरीब जनतेला विशेषत: अन्न सुरक्षा आणि अत्यंतोदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना हरभरा डाळ पस्तीस रुपये, उडीद डाळ ४४ रुपये आणि साखर २० रुपये किलो दराने दिले जाणार होते. मात्र हरभरा आणि उडीद पैकी एकच डाळ मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. गुरुवार १ नोव्हेंबरपासून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानात एक किलो साखर आणि डाळ वितरीत केली जाणार होती. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या गरीब जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पण अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा हा दावा साफ खोटा ठरला आहे. त्यामुळे आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या गरीब जनेतला दिवाळी सणासाठी खाजगी किराणा दुकानातून साखर आणि डाळ बाजारभावाप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रशासनाविरोधात रोष निर्माण होत आहे .

‘'ई परिमंडळला १४० 'क्विंटल' हरभरा डाळ, ७० 'क्विंटल' उडीद डाळ आणि २१० 'क्विंटल' साखर उपलब्ध करून दिली आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ठ असलेल्या शिधापत्रिका धारकांना डाळ आणि साखर स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.’’
- प्रशांत खताळ , ई परिमंडळ अधिकारी, येरवडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com