पिंपरी (पुणे) - दुचाकी घसरून विद्यार्थ्याचा मृत्यू

संदीप घिसे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना काळभोरनगर येथे शुक्रवारी सकाळी घडली 

प्रशांत सीताराम कांबळे (वय १६, रा. काळभोरनगर, आकुर्डी) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास प्रशांत दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी त्याची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Due to the collapse of a bike, the death of the student