वीजपुरवठा खंडीत झाल्याने बारामतीकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

तांत्रिक कामासाठी आज शहराच्या बहुसंख्य भागातील वीजपुरवठा सकाळी दहापासूनच बंद ठेवण्यात आला होता. महावितरणने त्याची पूर्वकल्पना एसएमएस व प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेली असली तरी ऐन उन्हाळ्यात दिवसभर खंडीत वीजपुरवठ्याने बारामतीकरांची घामांच्या धारांनी अनेकदा आज आंघोळच झाली.

बारामती (पुणे) : जवळपास सात तासांच्या खंडीत वीजपुरवठ्याने आज बारामतीकरांच्या अंगाची लाही लाही झाली. तांत्रिक कामासाठी आज शहराच्या बहुसंख्य भागातील वीजपुरवठा सकाळी दहापासूनच बंद ठेवण्यात आला होता. महावितरणने त्याची पूर्वकल्पना एसएमएस व प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेली असली तरी ऐन उन्हाळ्यात दिवसभर खंडीत वीजपुरवठ्याने बारामतीकरांची घामांच्या धारांनी अनेकदा आज आंघोळच झाली.

आज सकाळपासूनच बारामतीत ढगाळ वातावरण असल्याने आर्द्रतेचेही प्रमाण अधिक होते. त्यात दुपारी सव्वा चारपर्यंत वीजपुरवठा खंडीत राहिल्याने उष्णतेच्या तडाख्याने बारामतीकरांच्या जिवाचे अक्षरशः पाणी झाले. घर तसेच कार्यालयात उष्णता सहन होत नसल्याने लोकांचा जीव कासावीस झाला होता. आजही बारामतीच्या तापमानाचा पारा 39 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत गेलेला होता. उन्हाने हैराण झालेल्या बारामतीकरांकडून आता वरुणराजाच्या आगमनाची आतुरतेने प्रतिक्षा होत आहे.

Web Title: due to the disruption of power supply in baramati

टॅग्स