आंबेगावात अवकाळी पावसाने कांदा, कच्च्या कैऱ्यांचे नुकसान

सुदाम बिडकर  
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी परिसरात आज मंगळवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरीचे पीक भुईसपाट झाले तर आंब्याच्या झाडाच्या कच्च्चा कैऱ्या गळुन पडल्याने मोठे नुकसान झाले. शेतात काढुन ठेवलेला कांदा झाकुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली तसेच विटभट्टीवरील मातीच्या कच्चा विटा झाकून ठेवण्यासाठी विटभट्टी व्यावसायिकांना पळापळ करावी लागली.

मेंगडेवाडी, जारकरवाडी व अवसरी बुद्रुकच्या काही भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. सुमारे पाऊणतास पाऊस पडत होता या पावसाने काढणीला आलेली उन्हाळी बाजरी, स्विटकॉर्न मकेचे पीक भुईसपाट झाले. आंब्याच्या झाडाच्या कच्च्या कैऱ्या गळुन पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मेंगडेवाडीचे माजी सरपंच भरत फल्ले यांनी सांगितले. याभागात सध्या कांदा काढणी सुरु आहे शेतात काढुन ठेवलेला कांदा भिजु नये यासाठी तो प्लास्टिक कागदाने झाकुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतात पाणी साचले होते हा पाऊस उन्हाळी भुईमुग तसेच ऊस पिकासाठी व जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी फायदेशीर असल्याचे अवसरी बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य अजीत चव्हाण यांनी सांगितले.  

Web Title: due to Drought rain onion mango damages