अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच सोशल मीडियावर व्यक्त झालो : योगेश सोमण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

पुणे : ''अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे सांगून 600 जणांची झुंड करून भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करू नका असा कट रचला गेला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मी सोशल मीडियावर व्यक्त झालो.'' असे अभिनेते योगेश सोमण यांनी "सकाळ"शी बोलताना स्पष्ट केले. 

अभिनेते अमोल पालेकर, नसरूद्दीन शाह, शबाना आझमी आदी कलाकारांनी 600 जणांची सही असलेले पत्रक तयार केले. त्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांना मतदान करू नका असे आवाहन केले होते. हा मुद्दा अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून खोडून काढला. तसेच "सकाळ"च्या फेसबुक बुलेटीनदरम्यान त्यांनी ही पोस्ट का टाकली याचे कारण स्पष्ट केले.

"सकाळ"शी बोलताना त्यांनी सांगितले, "600 जण जेव्हा सही करून मते देऊ नका असे सांगतात तेव्हा हे मांडता येणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही का? हे सर्व लोक मिळून नोटा या पर्यायाचा वापर करा असे सांगतील परंतू त्यामुळे एखादा लायक नसलेला उमेदवार निवडून येण्याचा धोका जास्त आहे. त्यांच्या कृतीवर बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे म्हणून मी व्यक्त झालो. मी मुद्‌द्‌यांना विरोध केला आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला माझा विरोध नाही." 

Web Title: due to freedom of expression I Expressed on social media said Yogesh Soman