पावसामुळे एसटीला होतोय विलंब

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 16 जुलै 2018

आभाळ फाटल्यागत मागील काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जाणवू लागले आहे. त्यातच परवा माळशेज घाटात दरड कोसळल्यामुळे  वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. आज सकाळ पासून पाऊस बरसतोय.

मुंबई: आभाळ फाटल्यागत मागील काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जाणवू लागले आहे. त्यातच परवा माळशेज घाटात दरड कोसळल्यामुळे  वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. आज सकाळ पासून पाऊस बरसतोय.

नवी मुंबईतील वाशी बसस्थानकावर मुंबई-नारायणगाव बसची वाट पहात बसलेले प्रवासी आज बस येईल की नाही या विचारात असतानाच बस वाहतूक नियंत्रकांनी बस पावसामुळे कल्याणला आलीच नसल्याचे सांगितले. सकाळी 8 वाजता नारायण गाव एस.टी.डेपोहुन निघालेली नारायणगाव-मुंबई बस मुरबाड येथे पांजरापोळ जवळील पुलावर पाणी वाहत असल्यामुळे माघारी फिरल्याचे सांगितले जाते. कल्याण, वाशी, मुंबईत पाऊस कोसळत असल्यामुळे सखल भागात पाणी तुंबल्याने बस रस्त्यावरच अड़कल्याचे सांगितले जात आहे.

पावसाच्या वाढत्या जोरासमोर सगळेच वाहतूक मार्गावरील वाहतूक संथ आणि उशिरा होत असल्याचे दिसून येत आहे.माळशेज आणि खंडाळा घाटात वाहतूक संथ पणे पुढे सरकत आहे असे काही प्रवाश्यांनी सांगितले आहे.

Web Title: due to heavy raining ST bus are delay