#PuneRains : कोथरूडमध्ये जोरदार पावसाने नाल्यालगतच्या घरात शिरले पाणी; भिंत पडल्याच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर काॅलनी,  लालबहादुर शास्त्री काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, शिवांजली मित्र मंडळ, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर येथील नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी  शिरून मोठे  नुकसान झाले. पहाटे तीनपर्यंत लोक पाणी काढत होते. जयभवानीनगर येथे चाळ क्र. 2 व 3 मध्ये फरशी खालून पाणीवर येत होते. येथील पावसाळी वाहिनीचे काम करण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली

कोथरूड : रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोथरूडमध्ये अनेक भागात पाणी शिरले. काही ठिकाणी सीमा भिंतीपडून नुकसान झाले. पावसाचे पाणी दुचाकीत शिरल्याने गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या.

म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर काॅलनी,  लालबहादुर शास्त्री काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, शिवांजली मित्र मंडळ, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर येथील नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे  नुकसान झाले. पहाटे तीनपर्यंत लोक पाणी काढत होते. जयभवानीनगर येथे चाळ क्र. 2 व 3 मध्ये फरशी खालून पाणीवर येत होते. येथील पावसाळी वाहिनीचे काम करण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली.

पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कुंबरेपार्क येथे तळमजल्यात पाणी साचले होते. तेथेच वीज मीटर असल्याने रहीवाशी भयभीत झाले होते. सोसायटीला लागूनच कोथरूड पीएमटी डेपो आहे. तेथून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे संरक्षक भिंत पडल्याने  पाणी सोसायटीमध्ये घुसले.

आणखी वाचा - दगडूशेठ हलवाई मंदिरसमोर वाहत होते पाणी, पाहा व्हिडिओ

आणखी वाचा - पावसाने उडवली पुणेकरांची झोप

उजवी भुसारी काॅलनीतील  सिद्धिविनायक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. येथील नाल्यात राडारोडा असल्याने पाणी जायला जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सोसायटीच्या सीमा भिंतीला तडा गेला. भिंत खचली आहे.

उजवी भुसारी कालनी मधील पुरुषोत्तम सोसायटीमध्ये पाणी सात आहे. डावी भुसारी काॅलनीतील सुवर्णनगरी सोसायटी लगत खोदकाम सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहाने सीमा भिंत पडली. पाण्याच्या टाकीत माती व चिखल गेला.

एकलव्य काॅलेजकडून येणारे पाणी शांतीबन सोसायटीमध्ये शिरत आहे. सहकारवृंद सोसायटीलगत असलेली मिलेट्रीची भिंत पडली.सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

Pune Rain Updates : सहकारनगर, धनकवडीत पावसाचा हाहाकार; 227 मिलीमीटर पावसाची नोंद  

नगरसेविका अल्पना वरपे यांनी सांगितले की, ''अर्धवट झालेली नालेसफाई  व पावसाळी कामे यामुळे  धोका होवू शकतो  या बद्दल सकाळीच कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना कळवले होते.  रात्रो अनेक घरात पाणी शिरले . महानगरपालिकेने  तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.''

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to heavy rains flooded a house near Nala In Kothrud