पुणे : अपमानित झालेल्या पाणी वितरकाने टाकीचा व्हॉल्व्ह केला बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कात्रज : राजीव गांधीनगर अप्पर या भागात पाणी अवेळी व अपुरे येते म्हणून पाणी वितरण करणाऱ्या चावीवाल्याला एका नागरिकाने मारहाण केली. अपमानित झालेल्या चावीवाल्याने केदारेश्वर पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व बंद करून लाखो नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला

कात्रज : राजीव गांधीनगर अप्पर या भागात पाणी अवेळी व अपुरे येते म्हणून पाणी वितरण करणाऱ्या चावीवाल्याला एका नागरिकाने मारहाण केली. त्यामुळे अपमानित झालेल्या चावीवाल्याने केदारेश्वर पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह बंद करून लाखो नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा विभागाने धाव घेवून पाणी वितरण सुरळीत केले. 

अप्पर भागातील राजीव गांधीनगर येथे बहुतांश भागात वेळेवर तासभर पाणी वाटप होते. त्याचवेळी काही मोजक्या गल्ल्यांना अवेळी व अपुरा पाणी पुरवठा होतो. याचा जाब खासगी ठेकेदारांकडे काम करणाऱ्या चावीवाला अशोक भिमसू पारसे याला एका नागरिकाने विचारला. पारसे यांच्या उत्तराने संतापलेल्या नागरिकाने त्याला मारहाण केली.

पारसे यांनी अप्पर पोलिस चौकीत तक्रार दिली. अपमानित झालेल्या पारसे यांनी पाणी बंद ठेवून कात्रज कोंढवा रस्ता, गोकुळनगर, राजस सोसायटी परिसर, सुखसागरनगरमधील लाखो नागरिकांना वेठीस धरले.

Web Title: due to Humiliation the water distributor stopped the water supply