मुलभुत सुविधांअभावी दापोडीतील सिद्धार्थनगर वंचित

sanghvi
sanghvi

जुनी सांगवी - दापोडी प्रभागातील शेवटचे टोक असलेला पुणे मुंबई रस्त्यालगतचा सिद्धार्थनगर हा जवळपास सात ते आठ हजार लोकवस्तीचा भाग आहे. एकीकडे शहराच्या भरभराटीत तितकाच दुर्लक्षित व मागास राहिल्याचे येथील मुलभुत प्रश्नांनी समोर येत आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या वल्गना करीत असताना येथील नागरीकांना मुलभुत सुविधाच व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही ही माणसं आहोत अशी आर्त हाक येथील रहिवाशांकडुन ऐकायला मिळते. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. उघडी गटारे तुंबलेले चेंबर,झाकणं नसलेले चेंबर यामुळे मैलामिश्रितपाणी रस्त्यावर येत आहे. नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागते. लहान मुले, जेष्ठांचे आरोग्य अबाधित कसे राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधुन विचारला जात आहे. या भागात कष्टकरी कामगार, मजुरवर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. 

खचलेले छोटे रस्ते त्यात वर खाली खड्डेमय चेंबर, उघडी गटारे यामुळे रहिवाशांना दुर्गंधी बरोबरच अन्य साथीच्या आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. तुंबलेल्या घाण पाण्यामुळे डास,किटकांच्या प्रमाणातही या परिसरात वाढ झाली आहे.याबाबत पालिका मलनिस्सारण विभागाशी संपर्क साधला असता येथील कमी व्यासाच्या ड्रेनेजलाईन बदलुन मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालिका प्रशासनाकडुन अजुनही ब-याच ठिकाणी भुमिगत सांडपाणी गटारांचा प्रश्न जैसे थे च आहे.अनेक ठिकाणी उघड्या सांडपाण्याचा नाल्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.येथील भागात अनेक उघड्या सांडपाणी गटारांमुळे परिसरात .तुंबलेल्या उघड्या गटारांमुळे  परिसरात दुर्गंधी,डास,माशा किटकांच्या त्रासाला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.नियमित स्वच्छता होत नसल्याने सार्वजनिक स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसुन येते.

रस्त्यावर मैलामिश्रित पाणी-येथील गुलाबनगर,सिद्धार्थनगर जोडरस्त्यावर उघड्या गटार व सार्वजनिक शौचालयाचे ड्रेनेज चेंबर एकत्रित येतात.यातच उघड्या सांडपाणी गटारात कचरा अडकुन येथील झाकणाविना उघड्या असलेल्या चेंबरमधुन घाणपाणी रस्त्यावर येते.पावसाळ्यात येथुन ये जा करणे जिकिरीचे ठरते.नाईलाजास्तव नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागत असल्याचे रहिवाशी सांगतात गेली अनेक वर्षापासुन येथे कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरीकांना यातुनच मार्गक्रमण करावे लागत आहे.

येथील चेंबर वारंवार तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी येते.गणपती मंदीर गल्लीतही चेंबर तुंबल्याने शौचालयातुन घाण पाणी वर येते.पावसाळ्यात रहिवाशांना हा नित्याचा त्रास आहे.अनेक दिवसांपासुन तक्रारी करूनही प्रश्न सोडवला जात नाही. प्रकाश शिंदे-नागरीक

येथील भुमिगत मोठ्या व्यासाच्या ड्रेनेजलाईन टाकण्याबाबत नागरीकांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे.मात्र काम होत नाही.-गोपाळ मोरे-नागरीक

कोट-छोट्या गल्ल्या अरूंद रस्ते यामुळे येथील दुरूस्तीची कामे करण्यास अडथळे येतात.सध्या या भागात मोठ्या व्यासाच्या ड्रेनेजलाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे.पुढील आठवड्यात येथे एका गल्लीच्या ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.येथे मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.यामुळे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. श्री.आर.एन. जिंतिकर-कनिष्ठ अभियंता पालिका मलनिस्सारण विभाग-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com