पुणे : जुन्या भांडणावरून महिलेच्या बंगल्यावर दगडफेक; पाळीव श्‍वान जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

पुणे ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्‍याने महिलेच्या घराच्या काचा फोडत पाळीव श्‍वानास दगड मारून त्यास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मागील रविवारी रात्री साडेनऊ वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली. 

याप्रकरणी सती कलतुर (रा.आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्दमधील वाघजाई नगरमधील रंगा पॅलेस येथे फिर्यादी यांचा बंगला आहे.

फिर्यादी व अन्य सहा जणांची अनेक वर्षांपासून भांडणे आहेत. त्याचा राग मनात धरून संबंधीतांनी मागील रविवारी रात्री साडे नऊ वाजता फिर्यादी यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या बंगल्यातील तळघर व पहिल्या मजल्यावरील खिडक्‍यांच्या काचा फुटल्या. तसेच फिर्यादी यांच्या पाळीव श्‍वानावरही दगड फेकले. त्यामध्ये श्‍वानाच्या पायास व पाठीमागील बाजुस दगड लागल्याने श्‍वान गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी फिर्यादींनी संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 

Web Title: Due to Old Disputes stone pelting at Bungalow of Woman