प्रवासी वैमानिकामुळे उड्डाणाचा मार्ग मोकळा

Plane
Plane

पुणे - दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्याचे आवश्‍यक प्रशिक्षण वैमानिकाला दिले नव्हते. त्यामुळे विमानाला झालेला विलंब टाळण्यासाठी एका प्रवाशाने पुढाकार घेतला. संबंधित विमान कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली आणि त्याने हे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरविले. हा प्रवासी या कंपनीचा प्रशिक्षित वैमानिक (कॅट ३ बी) होता.  

पुणे विमानतळावरून गेल्या शनिवारी सकाळी इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीला रवाना होणार होते; पण दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्याचे प्रशिक्षण वैमानिकाला नव्हते. त्यामुळे उड्डाणाला होणारा विलंब होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही परिस्थिती लक्षात घेत विमानातील एक प्रवासी पायलट बरोबर चर्चा करू लागला. त्याने इतर प्रवाशांना दिल्लीतील परिस्थितीबाबत माहिती दिली आणि धुके कमी होईपर्यंत उड्डाण होणार नसल्याचे सांगितले. हा प्रवासी या कंपनीचा प्रशिक्षित वैमानिक असल्याने त्याला धुक्‍यात विमान चालविण्याचा अनुभव होता. त्यामुळे त्याने कंपनीकडे विमान उड्डाणाची परवानगी मागितली. 

कंपनीने परवानगी दिल्यानंतर या विमानाचा वैमानिक बदलून कॉकपीटचीजबाबदारी प्रवासी वैमानिकाकडे देण्यात आली. त्यानंतर सव्वा नऊच्या सुमारास या विमानाचे उड्डाण झाले आणि दिल्ली विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरविण्यात आले. याबद्दल सर्व प्रवाशांनी संबंधित वैमानिकाचे आभारही मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com