पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेची प्रसूती सुखरूप

जनार्दन दांडगे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे दृष्य पाहून आपल्या वागण्यात बदल केला. माणूसकीच्या संवेदना कामापेक्षाही अधिक महत्वाच्या चौघांनीही मानल्या. जेव्हा त्याच्या समोरच एक गर्भवती महिला रस्त्यातच प्रसूत झाली. काही काळासाठी का होईना हा पण दोन्ही पोलिसदादा व त्यांचे दोन सहकारी त्या नवजात अर्भकासाठी 'मामा' बनले तर महिलेसाठी भाऊ..

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे दृष्य पाहून आपल्या वागण्यात बदल केला. माणूसकीच्या संवेदना कामापेक्षाही अधिक महत्वाच्या चौघांनीही मानल्या. जेव्हा त्याच्या समोरच एक गर्भवती महिला रस्त्यातच प्रसूत झाली. काही काळासाठी का होईना हा पण दोन्ही पोलिसदादा व त्यांचे दोन सहकारी त्या नवजात अर्भकासाठी 'मामा' बनले तर महिलेसाठी भाऊ.. आणि हे सुखद चित्र लोणी स्टेशन परिसरातील शेकडो लोकांनी आपल्या डोळ्यात साठवले व जमलेल्या लोकांनी पोलिसांना धन्यवाद दिले. 

तमन्ना हमीद शेख (वय 30, रा. सध्या बाजारमळा, लोणी काळभोर, मुळगाव वैराग ता. बार्शी जि. सोलापुर) हे त्या रस्त्यात जन्म दिलेल्या बाळाच्या आईचे नाव असून, वरील प्रकार पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. संदीप देवकर व सतीश राजपूत ही तमन्ना शेखला मदत करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असून, दोघेही लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. 

तमन्ना शेख या आपल्या आठ वर्षांच्या माहिरा या मुलीसह लोणी स्टेशन परिसरातील एका बड्या रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी पायी चालल्या होत्या. लोणी स्टेशन चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्याने, त्या रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असतानाच, त्यांना प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. कोणालाही काही कळायच्या आत त्या रस्त्यातच कोसळल्या. लोकांना वाटले की तमन्ना शेख या खाली बसल्या असाव्यात. म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, चौकातच वाहने पुढे जाऊ देण्यासाठी उभे असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी संदीप देवकर यांना तमन्ना शेखची अडचण लक्षात आली.

यावर देवकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्यांचे सहकारी सतीश राजपूत यांना बोलावून, महिलेला मदतीसाठी दोघेही पुढे सरसावले. मात्र, महिलेची प्रसूती झाल्याचे लक्षात येताच, देवकर यांनी त्यांचे वाहतूक वॉर्डन अनिल अडागळे व दादा लोंढे यांना जवळच्या दुकानात चादर आनायला लावले. दरम्यान, दोन मिनिटांच्या आत चादर येताच, देवकर व राजपुत यांनी रस्त्यातून जाणाऱ्या एका महिलेस अडवून, तिच्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर महिलेला व नवजात मुलीला उचलण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी तमन्ना शेख व तिच्या नवजात बाळाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन पुढील उपचारांसाठी दाखल केले.

दरम्यान, घडत असलेले दृष्य पाहणाऱ्या शेकडो लोकांनी पोलिसांच्या कार्यतप्तरतेला सलाम केला. संदीप देवकर व सतीश राजपूत यांनी दाखवलेल्या माणुसकीला सलाम. तर त्यांना तप्तरेतेने मदत करणाऱ्या वाहतूक वॉर्डन अनिल अडागळे व दादा लोंढे यांचेही अभिनंदन केले.

पोलिसांची मदत लाख मोलाची...

तमन्ना शेख पोलिसांच्या मदतीबद्दल बोलताना म्हणाल्या, आठवा महिना चालू असल्याने, कोणालाही मदतीला न घेता सोनोग्राफी करण्यासाठी पायी निघाले होते. मात्र, रस्त्यातच प्रसुती कळा सुरु झाल्याने काही कळायच्या आतच प्रसूती झाली. ही घटना घडल्यावर क्षणाचाही विलंब न लावता संदीप देवकर व सतीश राजपूत व त्यांची सहकाऱ्यांनी केलेली मदत मी विसरुच शकत नाही. माझ्यासाठी दोघेही देवदूत आहेत. दोघांचेही मनापासून धन्यवाद

Web Title: Due to policemen delivery of woman is Successful