राजकीय दबावामुळे पाणी चोऱ्यावर कारवाई करण्यास अडचण

Due to political pressures there is a problem of water stolen
Due to political pressures there is a problem of water stolen

वालचंदनगर - सायफन म्हणजे नीरा डाव्या कालव्याला झालेला एक प्रकाराचा कॅन्सरसारखा महाभयंकर रोग आहे. राजकीय दबावामुळे सायफनवरती कारवाई करण्यास अडचण येत असल्याची कबुली निमगाव केतकी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याने पोलिसासमोर दिली. 

13 मार्च पासुन धरणातून उन्हाळी हंगामातील शेतीच्या आवर्तनला सुरवात झाली अाहे. प्रशासनाने एका उन्हाळी आवर्तनासाठी सुमारे चार टीएमसी पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र धनदांडग्या शेतकऱ्यांनी नीरा डाव्या कालव्या भराव खोदुन बेकायदेशीपणे शेकडो सायफन केले असून दररोज लाखो लिटर पाण्याची भरदिवसा केली जात आहे. तसेच मोठ्या वितरिकेला ही सायफन करुन पाणी चोरी करण्याची सवय शेतकऱ्यांना लागली आहे. सायफनवाल्यांना राजकीय पुढाऱ्याचा पाठिंबा असल्यामुळे अधिकाऱ्यांना ही कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. सायफनद्वारे पाणी चोरी केल्यामुळे सर्वसमान्य शेतकऱ्यांना हकक्काचे पाणी मिळत नसून हजारो एकरातील पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडून 45 दिवस झाले तरीही तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कळंब, लासुर्णे, बेलवाडी परीसरातील  शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळेला नाही. तसेच सतत उन्हाळी हंगामध्ये 

उशीरा पाणी येत असल्यामुळे बेलवाडी (ता. इंदापूर) येथील अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. सायफन म्हणजे पाटबंधारे विभागाला झालेला महाभयंकर कॅन्सरसारखा रोग अाहे. राजकीय दबावामुळे सायफनवरती कारवाई करता येत नसल्याची कबुली पाटबंधारे विभागातील अधिकारी देत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेवरती पाणी कधी मिळणाार असा प्रश्‍न शेतकरी विचारु लागली आहेत. 

नीरा डाव्या कालवा व वितरिकेमधून सायफनद्ववारे होत असलेल्या पाणीचोरी मुळे शेतकरी उपाशी, पुढारी तुपाशी अशी तालुक्यात परिस्थिती झाली आहे. पाणी चोऱ्यांना लगाम घालण्यासाठी त्यांना पाणीचोरीच्या दहा पट दंड करुन त्यांच्या उताऱ्यावर बोजा करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com