शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार

विजय मोरे 
रविवार, 9 डिसेंबर 2018

उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  बहुतांशी गावाना पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीने टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या भागातील पाणी टंचाई कमी व्हावी, यासाठी महसूल व पंचायत समिती प्रशासनाने टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. मात्र सदरचे शिरसाई योजनेच्या लाभार्थी गावात सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीला फायदा होत असलेल्या पाझर तलावात सोडण्यात येत आहे. तेही पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. 

शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी खडकवासला कालव्यातून देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शिर्सुफळ तलावातील मृद साठा व कालव्याचा पाझर यामुळे लाभार्थी 15 गावाना फक्त 50 दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. असे जानकारांचे मत आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थी सर्व गावाना पाणी मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आत्तापर्यंत योजनेतून 32 दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले आहे. यामध्ये शिरसाईच्या डाव्या कलव्यावरील उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बोळोबाचीवाडी, जराडवाडी, बऱ्हाणपूर, शिर्सुफळ या गावात पाणी सोडण्यात आले आहे. तर उरलेल्या पाण्यातून उजव्या कालव्यावरील उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे व अंजनगाव या गावाना पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेचे पाणी कोणी चोरुन शेतीला घेवू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त घेण्यात आल्याचे योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग यांनी सांगितले. मात्र शिल्लक पाण्यात राहिलेल्या गावाना पाणी मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या गावाना बसण्याची शक्यता आहे. 

याबाबत उंडवडी सुपे उपसरपंच पोपट गवळी म्हणाले, "दुष्काळ निवारणावर उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाचे ढिसाळ नियोजन असल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. " 

 

Web Title: Due to poor governance, the Shirasai scheme will collapse