अधिक्षकांच्या भूमिकेमुळे पोलिसांचे मनोबल वाढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

बारामती : सावकारीच्या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे आता पोलिसांचेही मनोबल वाढल्याचे चित्र आहे. 

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी कसलीच भीडभाड न बाळगता सावकारीच्या गुन्ह्यात कठोर कायदेशीर कारवाईची भूमिका घेतल्यानंतर त्याचे समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झाले.

बारामतीत गेल्या काही दिवसात सातहून अधिक गुन्हे दाखल झाले असताना पोलिसांकडे या बाबतच्या तक्रारींचा ओघच आता सुरु झाला आहे. सावकारीच्या अनेक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यानंतर समाजमनही अस्वस्थ झाल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे. शिरगावकर व धुमाळ यांच्यासह इतरही पोलिस अधिकारी सावकारीच्या प्रकरणात आलेल्या तक्रारींचा सखोल अभ्यास करुन या बाबत काय भूमिका घ्यायची याची दिशा निश्चित करीत आहेत. 

सामान्यांच्या असहायतेचा फायदा घेत समाजातील अनेक तथाकथित सावकार व्याजाच्या नावाखाली पिळवणूक करण्यासोबतच मानसिक छळ करुन अनेकदा वस्तू, गाडया घेऊन जातात, काही प्रकरणात महिलांना त्रास देण्यापर्यंत काही सावकारांची मजल गेल्याची शहरात चर्चा आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी जी कडक भूमिका घेतली आहे, त्याचा अप्रत्यक्ष दिलासा कर्जदारांना मिळू लागला आहे. व्याज जाऊ दे मुद्दल परत केले तरी चालेल अशी नरमाईची भूमिका काही सावकारांनी आता घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

पोलिसांनी सातत्य ठेवावे
 अद्यापही अनेक जण सावकारांच्या दमदाटीला घाबरुन तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, मात्र पोलिसांनी जर कारवाईत सातत्य ठेवले तर सावकारीचे प्रमाण कमी तर होईलच शिवाय सामान्यांची पिळवणूक थांबेल, अशीही चर्चा आहे.
 
Web Title: Due to the role of the Superintendents, the morale of the police increased